#Article370 निर्णयाबद्दल लोकांना काय वाटतंय

Reactions of people on Article 370
Reactions of people on Article 370

जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 370 (त्यातील पहिली तरतूद वगळून) रद्द करण्याचे विधेयक राज्यसभेने बहुमताने मंजूर केले आणि देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव झाला. चिठ्ठ्यांद्वारे झालेल्या अंतिम मतविभाजनात सरकारच्या बाजूने 125 तर विरोधात 61 मते पडली. 

काश्मिरबद्दल काहीही बोलायचं झालं की एक वाक्य नेहमीच ठरलेलं असतं, 'Kashmir is an integral part of India'. मात्र, काल खऱ्या अर्थाने या वाक्याला न्यायल मिळाला अशी प्रतिक्रिया देशभरातून उमटत आहे. 

नोंदवा आपले मत येथे- 

वाचकांच्या प्रतिक्रिया

1. नरेंद्र मोदी सरकारने काश्मिरबाबतचे अनुच्छेद 370 आणि 35A कलम रद्द करून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. काश्मिरच्या जवळपास सर्वच नेत्यांनी, काँग्रेसच्या साथीने, गेली सत्तर वर्षे या कलमांचा प्रचंड प्रमाणात दुरुपयोग केला. काँग्रेसच्या नेत्यांनी तथाकथित मुस्लिम व्होट बँक जपण्यासाठी, हा दुरुपयोग होऊ दिला. घटनेमध्ये तात्पुरत्या आणि परिवर्तनशील असलेले 370वे कलम, कायमस्वरूपी असल्याचा खोटा प्रचार करून काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेला अंधारात ठेवले. या कलमाचा वापर करून या सत्तापिपासू नेत्यांनी काश्मिरी जनतेला विकास करण्याची, आधुनिक सुविधांचा लाभ घेण्याची, शिक्षण, क्रीडा, कला, विज्ञान, साहित्य अशा क्षेत्रांमध्ये कौशल्य दाखवण्याची संधीही दिली नाही. तेथील पर्यटन व्यवसाय विकसित करण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही. उलट या नेत्यांनी, पाकिस्तान आणि फुटीरतावाद्यांच्या मदतीने तेथे दहशतवादाचा भस्मासुर उभा केला. काश्मीर मधील अनेक पिढ्यांनी आपले आयुष्य याच दहशतवादाच्या सावटाखाली घालवले आहे. याच स्वयंनिर्मित दहशतवादाचा सामना करण्यासाठी काश्मिरी नेत्यांनी केंद्र सरकार कडून वर्षाकाठी करोडो रुपये लाटून आपल्या तिजोऱ्या भरून घेतल्या आहेत. मोदी सरकार ने हे जुलमी कलम रद्द करून काश्मिरी जनतेसाठी विकासाची नवीन दारे उघडली आहेत. काश्मीर आता इतर राज्यांप्रमाणे विविध क्षेत्रांत प्रगती करू शकेल. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. पर्यटनाला सोनेरी दिवस येतील.  याबरोबरच या दोन्ही कलमांचा वापर करून काश्मिरी महिलांवर अन्याय करणाऱ्यांना आणि देशविरोधी कारवाया करणाऱ्यांनाही चाप लावला आहे. या धाडसी निर्णयामुळे काश्मीर पुन्हा एकदा भारताचे नंदनवन होईल यात संशय नाही. 
-शिवराम वैद्य

2. सोमवार 5 ऑगस्ट हा दिन आमच्या इतिहासातील सुवर्ण दिन होय. राज्यसभेने जम्मू आणि काश्मीर फेररचना विधेयक बहुमताने मंजूर करून भारतीय नागरिकांच्या अखंड भारताच्या स्वप्नांची मुहुर्त मेढ रोवली असे मला वाटते. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे दुसऱ्या देशांनी आमच्या अंतर्गत बाबीत लुडबुड करू नये,जे आमचे आहे त्यात परिस्थिती प्रमाणे जनहीतासाठी बदल करणे हा आमचा व केवळ आमचाच अधिकार आहे. गेल्या 70-72 वर्षांत केवळ घरणेशाहीने आमच्या देशाला लुटले काश्मीरच्या मूळ रहिवाशीवर अन्याय केला हे चुकीचे होते, ठीक आहे केंद्र सरकारने हा घेतलेला निर्णय घाईचा किंवा लोकांचे मत जाणून न घेता घेतलेला निर्णय जरी काही जण म्हणत असले असे वाटत असले तरी विद्यमान परिस्थितीचा विचार करता ते शक्य नव्हते. मात्र, जे झाले ते योग्य व काश्मिरी जनतेसाठी तेथील विकासासाठी योग्य होय व देशासाठी तर सर्वोत्तम होय,एक चांगला व देशहिताचा हा निर्णय होय. काश्मिरी जनतेच्या हक्काचा हा निर्णय आहे.
-धोंडिरामसिंह ध राजपूत

3. 5 ऑगस्टला भारतीय संविधान पहिल्यांदा संपूर्ण भारतात लागू झाले याचा खूप आनंद होत आहे. आंबेडकरांचे स्वप्न आज पूर्ण झाले. या निर्णयाचा काशमिरला शिक्षणात, औद्योगिकीरणात, रोजगार मिळण्यात, गरिबी हटवण्यात मोठी मदत होईल. काश्मीर आणि लडाख केंद्रशासीत प्रदेश झाल्यामुळे चीन किंवा पाकीस्तान ने घुसखोरी केल्यानंतर थेट दिल्लीहून ठोस निर्णय घेण्यात मदत होईल व लवकर निर्णय घेण्यास मदत होईल. भाजप सरकारचा हा एक चांगला निर्णय आहे. 
-जयप्रकाश सातपुते 

4. कलम 370 रद्द होणं ही भारतीय एकसंघतेसआठी आवश्यक बाब होती. त्यामुळे सरकारच्या या साहसी निर्णयाचं स्वागतच आह्. कलम 370 रद्द झाल्याने खऱ्या अर्थाने आज भारत 'एक देश- एक संविधान- एक तिरंगा' या सूत्रात बांधला गेला.
-प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर सानप

5. मोदी-शहांनी कश्मिरवर 'कँन्सर ची शस्त्रक्रिया' करण्याचं जे धाडस दाखवलं ते कौतुकास्पद आहे यात शंकाच नाही. कश्मिरी जनता आता मुख्य प्रवाहात येऊन त्यांचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास होईल. तसेच फुटीरतावादी मानसिकता कालांतराने कमी होईल. पण या निर्णयामुळे कश्मिरींचे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटले अशा भ्रमात राहणं योग्य नाही. कँन्सरची शस्त्रक्रिया तर पार पडली पण अजून 'सेकंडरीज' आहेतच. किमोथेरपी घ्यावी लागेल. कदाचित पुन्हा अशीच दुसरी शस्त्रक्रिया करावी लागेल. 

आपला शेजारी उपद्व्यापी आहे आणि त्याला अमेरिकेसारखे मतलबी देश पाठिंबा देतात. त्यांच्यामुळेच पंजाब प्रश्न सुटण्यास 'लोंगोवाल करार' झाल्यानंतर 25 वर्ष गेली. पंजाबमध्ये अनेक वेळा लोकनियुक्त सरकारं आली-गेली. राष्ट्रपती राजवट आली-गेली. पण सारं स्थिरस्थावर होण्यास 25 वर्ष गेली. 

राष्ट्रवादाचा उधळलेला गुलाल शमला कि कश्मिरमधील पुढील मार्ग दिसु लागेल तोपर्यत देशप्रेमाच्या अतिरेकी भावनेला आवर घालून दूरदृष्टीने व्यवहार्य मार्गाची आखणी करणे योग्य होईल. हे करण्यास सरकार समर्थ आहे यात शंकाच नाही. पण समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे - 'अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापी नसावे'. निश्चलिकरणानंतर सगळं आलबेल झालं नाही. लोकांनी दुप्पट जोमाने काळा पैसा जमवला.

थोडक्यात समोरची बाजू शांत राहणार नाही, दुप्पट जोमाने कारवाया करणार हाच आत्तापर्यंतचा इतिहास आहे. फक्त आपल्याला उलट कारवाई करणं सोपं जाईल कारण तो आता केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्यांचा विशेष दर्जा संपुष्टात आला आहे.
-सीए गौतम पानसरे

6. देशाच्या इतिहासामध्ये अत्यंत अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित भाई शहा यांचे त्रिवार अभिनंदन! निवडणूकीमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याबद्दल शतशः आभार. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या देशभक्ताचे स्वप्न साकार केले व आज सर्व भारतीयांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर चा आनंद घेता आला .या निर्णयामुळे काश्मिरचे नंदनवन तर होईलच त्याच बरोबर सव्वा कोटी काश्मिरवासियांना उद्योग धंदे ,शिक्षण, रोजगार, आरोग्य व मूलभूत सुविधा मिळण्याचा मार्ग सुलभ होईल .पुन्हा एकदा मोदी सरकार व त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन 
-किरण दत्तात्रय दंडगे 

7. 1: after dissolving arrival 370 how we are going to claim p.o.k. and now do we have any claim on p.o.k.
2: Isn't is unconstitutional to pass the bill without giving this bill to study all members for 2 days 
3: Is Jammu and Kashmir is the only issue in front of our nation
4: Wasn't this division RSS agenda ..
5: How we are going to stop Kashmir valley from becoming Palestine.
6: Arrival 35A was pass by king of Kashmir in1927 for stopping other people from entering into Kashmir and prevent kashmiri pandits superiority. So now kashmiri pandits will behave like old days or they will obey Indian constitutions artical 15.
-Kunal Shinde

8. 1947मध्ये काश्मिरचे राजे हरिसिंग यांना अडचणीच्या काळात भारतीय सैन्याने  मदत केली. युद्धानंतर सार्वमताच्या नावाखाली व पुढे निर्माण झालेले 370 वादग्रस्त कलमामुळे अनेक फुटीरवादी पक्ष संघटना स्वतंत्र कश्मीरची मागणी करत होते. त्यामुळे वादग्रस्त 370 कलम हटवण्याचा मोदीसरकारच्या धाडसी निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा निर्णय म्हणता येईल. मुळात काश्मीरचे संरक्षण करताना त्यांना वेगळा दर्जा देणे योग्य नव्हते. या कलमामुळे फुटीरतावादी पक्षांना बळ मिळत होते. कश्मिरला विशेष दर्जा असल्याने तेथील दहशतवाद समूळ नष्ट करण्यात अनेक अडचणी येत असे. या सर्व गोष्टीचा विचार करुन गृहमंञी अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचा हा मास्टरस्टोक म्हणावा लागेल. 370 कलम हटवण्याबरोबर जम्मू-कश्मीर एकञित केंद्रशासिक प्रदेश करण्याची राजकीय खेळी ही चाणक्य राजकारणाची कूटनीती ठरु शकते. यातून सर्वसामान्य काश्मीरी जनतेने घाबरुन जाण्याची गरज नाही. ज्या काश्मीरी भारतीयांची देशावर प्रखर निष्ठा आहे. त्यांच्यासाठी या निर्णयांचा निश्चितच  चांगला म्हणावा लागेल. माञ फारुख अब्दुला , गुलाम नबी आझाद , मुफ्ती सारख्या नेत्यांचे राजकीय  अस्तित्व  या कलमांवर आधारित  असल्याने ते कश्मीरमध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न  करतील त्याकडे लक्ष न देता देशहिताचा विचार केला पाहिजेत  या ऐतिहासिक  निर्णय  म्हणजे  मोदी सरकारचा राजकीय  सर्जिकल स्टाईक म्हणावा लागेल.
-प्रशांत  कुलकर्णी    

9. Thank u very much Modi govt for taking this important decisions regarding Kashmir. 
The only thing in development process .. the beauty of Kashmir should not be spoil like kullu manaali and other many places. We should maintain it like Switzerland. So Modi Sarkar ... Plz do not ignore. it's very important thing. Thnx 
-Sandesh Jain

10. कलम ३७० हटविण्या मुळे दहशतवाद कमी होणार , याच कलमा मुळे काश्मीर मध्ये पर्यटनाचा विकास होईल, सर्वसाधारण लोकांना मोकळा श्वास घेता येईल.
-दर्शन पाटील

11. Yes we have taken a right decision at right time, though we were democratic we were not able to take quick decision, so this was the only way to pass such article.
-Sanjay Ghorpade
 

12. A red letter day in the history of free India...what else it can be described as?

Some are disliking it, many are liking it but nobody is able to ignore it. 

Political will & decisiveness based on mandate of the country and accompanied by perfect planning & execution can work wonders is evident from what happened on 5 August 2019.

The constitutional validity of the government's action will be tested in Supreme Court but in the hearts of  citizens...the government has already won!

The most important feature of this decision is that people have started believing that nothing is impossible. No problem is beyond solution. this has changed the way people think in the country.

What's more interesting is... political rivals standing with the government on the issue of right and wrong! This is a sign of maturing democracy!!
-Satyasheel Jahagirdar

13. अत्यंत धाडसी पण योग्य निर्णय. यामुळे काश्मिरी जनतेचा व्यवसाय विकासाच्या मार्गाने चांगला चालेल.बाहेरची बाजारपेठ उपलब्ध होईल.काश्मीरमध्ये शाळा,काॅलेज, इस्पितळ, निरनिराळे उद्योग या साठी चालना मिळेल. तेथील फळे, केशर, लोकर यास चांगले भाव मिळतील. अर्थात हे सगळे होत असताना स्थानिक काश्मिरवासीयावर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. तेथील नैसर्गिक सौंदर्याची जपणूक व जोपासना करण्याचे कार्य ठेवावे लागणार आहे. अन्यथा महाबळेश्वर, सिमला, पाचगणी, दारजीलींग, इत्यादी ठिकाणी जसे बाजारीकरण झाले, प्रदूषण झाले तसे या नंदनवनाचे होउ नये. सत्तर वर्षा पासून प्रलंबित असलेल्या या एका मोठ्या प्रश्नाला मोदी सरकारने  सहजगत्या सोडवले या बद्दल पंतप्रधान मोदीजी,आणि  गृहमंत्री अमित शहाजी आणि राष्ट्रपती महोदय यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो.
-माणिक गुमटे 

14. धारा 370 हटवून सरकारने अतिशय योग्य पाऊल उचलले आहे. आता खऱ्या अर्थाने भारत एकसंध झाला आहे. सर्व भारतीय एक दिलाने सरकारच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील. काश्मिरी जनतेला खऱ्या अर्थाने विकासाच्या वाटेवर आपण सर्व घेऊन जाऊ या. काश्मीरच्या विलीनीकरण प्रक्रियेबद्दलचे सर्व गैरसमज आता दूर झाले आहेत. कोणत्याही भ्रांत कल्पना, विमर्ष, कथने आता आपल्याला ह्या ऐतिहासिक कामगिरीचे स्वागत करण्यापासून थांबवू शकत नाहीत. 

एक देश, एक विधान, एक प्रधान हे आता सत्यात उतरत आहे आणि हे सगळे याची देही याची डोळा पाहायला मिळाले याचा विलक्षण आनंद होत आहे. हे सध्या करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या सर्वांना श्रद्धांजली.
-सुनील खेडकर

15. Historical decision for indian unity & soveringthy and development of j k.
- Manohar Jawlekar

16. कलमे रद्द केलीत तरी जम्मु-काश्मीर राज्याचे काय हा प्रश्न उनुत्तरीतच आहे. गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर बाबत धाडसी निर्णय घेतला त्या बध्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ३७० कलम रद्द करून जम्मु काश्मिर ची स्वायत्तता रद्द केली तसेच ३५अ कलम रद्द करून सवलती बंद केल्या हे खुपच छान केले आहे. त्यामुळे भारताचे स्वस्त राशन खाऊन परत भारतावरच दगड मारायचे हा प्रकार थांबणार आहे.प्रश्न एकच आहे की,आपण ३७० कलम रद्द केले तरी जम्मु काश्मिर विधानसभेत जम्मू काश्मीर भारतात सामिल व्हायला तयार आहे असा ठराव ते पास करतील काय? त्यामुळे त्यासाठी पुढील काळात सरकारला तिथे तसे वातावरण निर्माण करावे लागेल.तसेच पाकिस्तान गप्प बसणार नाही याकडेही लक्ष द्यावे लागेल. मोदी शहांचे हार्दिक अभिनंदन
-डॉ. व्ही. जी. सावंत

17. Government has done a good job really appreciable. It was needed because pakistan's militents & jammu-kashmir youth were jointly distroying india's image, were killing military to whom local government was supporting. Exept them no any indian could stay there. Now cancel Article 35A.
-Abhijeet Ghodke


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com