दुचाकी ट्रॅक पुन्हा पुर्ववत करावा?

सनी शिंदे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

बाणेर : बाणेर रस्त्यावर यशदा पासून ते पुणे विद्यापीठ चौकपर्यंत दुचाकीसाठीचा स्वतंत्र ट्रॅक बनविण्यात आला होता. नारंगी रंगाचे प्लास्टिकचे 2/3 फुट उंचीच्या खांब लावून दुचाकी साठी वेगळा ट्रॅक बनविला होता.  त्यामुळे दुचाकी वाहन चालकांना सोईचे झाले होते. तसेच चार चाकी वाहनांना ही दुचाकीचा अडथळा होत नव्हता. मात्र वाहनांच्या धडकेमुळे ते नारंगी खांब तुटल्याने सर्व खांब काढुन टाकण्यात आले. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या वेळी दुचाकी वाहन चालकांची मोठी गैरसोय होते आहे. तरीही पुणे वाहतूक पोलिस व पुणे मनपाने पुन्हा दुचाकीसाठी स्वतंत्र ट्रॅक बनवावा. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reboot bicycle tracks?