धोकादायक विद्युत रोहित्र पेटी हटवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

टाकवे बुद्रुक : टाकवे बुद्रुक गावाला प्रमुख वीजपुरवठा करणार्‍या विद्युत रोहित्राचा पेटी उघडी असल्याने येथे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. या विद्युत रोहित्राच्या बाजुलाच टाकवे जिल्ह्या परिषद शाळा, न्यु इंग्लिश स्कूल, असवले इंग्लिश मीडियम आणि अंगणवाडी या सर्व शाळाचे विद्यार्थी याच आवारात खेळण्यासाठी फिरकत असतात. तसेच, याच ठिकाणी दर सोमवारी आठवडे बाजार भरला जात असल्याने या दिवशी याच परिसरात गर्दी करतात. मुख्य म्हणजे याच ठिकाणी शेजारील बाजुला टाकवे ग्रामपंचायत कार्यालय असुनही अद्याप या समस्या सोडवण्यात आली नाही. 
 

Web Title: Remove the dangerous electrical light box