गाड्यांचे पार्किंग अतिक्रमण हटवा

अनिल बाळासाहेब अगावणे    
Monday, 10 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

डेक्कन : पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणारे अनुचित प्रकारांना आळा घातला होता. परंतु या ठिकाणी परत अतिक्रमणे वाढली आहेत. शिवाय बेशिस्तपणे गाड्यांचे पार्किंग होत असल्यामुळे पादचाऱ्यांना पदपथाचा वापर करता येत नाही. नव्याने बांधलेल्या प्रशस्त पदपथाचा वापर तेथील हॉटेल चालकांना व स्नॅक्स सेंटरला जास्त होतो. त्यामुळे या हॉटेल व स्नॅक्स सेंटर मध्ये येणारे ग्राहक आपली दुचाकी वाहने बेशिस्तपणे लावतात तासन् तास सिगरेट, तंबाखू-गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारत उभे असतात. 

रिक्षावाले तासनतास रिक्षा लावून ग्राहकांची वाट पाहत असतात. तरी अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. पुणे शहरातील स्वारगेट, महापालिका भवन, पुणे स्टेशन, डेक्कन येथील प्रमुख बस स्टॉप अतिक्रमण मुक्त करावे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: remove enorochment parking on