पौड रस्त्यावरील नो पार्किंगचे फलक काढा 

शिवाजी पठारे 
Monday, 11 November 2019

कोथरूड : पौड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर खांबाच्या कामासाठी अडथळे लावल्याने रस्ता अरुंद झाला होता. त्यासाठी सर्वत्र नो हॉल्टिंग व नो पार्किंगचे 
फलक महापालिकेने लावले होते. गेली दोन-अडीच वर्षे नागरिकांनीही हा त्रास सहन केला; परंतु आता मेट्रोच्या खांबांचे काम पूर्ण होऊन त्यासाठी लावलेले अडथळेही 

काढले आहेत. रस्ता आता रुंदही झाला आहे; परंतु फलक अद्यापही तसेच असून पूर्वीप्रमाणेच वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई चालू आहे. नागरिकांनी हा त्रास का सहन करायचा? का फक्त तिजोरी भरण्यासाठीच हा उपक्रम चालू आहे. महापालिका व लोकप्रतिनिधी ही याकडे लक्ष देत नाहीत. महापालिका व वाहतूक पोलिसांनी आतातरी याचा विचार करून हे फलक काढावेत व पूर्वीप्रमाणेच समांतर पार्किंगचे फलक लावून नागरिकांचा त्रास कमी करावा. यामुळे कोणतीही वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता नाही. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remove the Parking board on Poud Street