पोलिसांशिवाय मचाण कशासाठी?

दिपक कुमार सराफ
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : सोन्या मारुती चौक, लक्ष्मी रस्ता येथील झेब्रा क्रॅासिंगवर नेहमी दुचाकी वाहने उभी केलेली असतात. रस्ता ओलंडण्यासाठी नागरिकांना करसरत करावी लागते.  त्या अडचणीत भर टाकण्यासाठी तेथे पोलिस लोखंडी मचाण उभे करतात. त्या मागील उद्देश्य चांगला आहे. मचाणावर पोलिसाने ऊभे राहून आजू बाजूच्या असामाजिक, घातपातीच्या हालचालींवर लक्ष ठेऊन योग्य ती कारवाई करण्यासाठी हे मचाण ठेवले जाते.

दिपावलीच्या दिवसांत रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने हिसकवून चोरी करणाऱ्यांना पकडण्यासाठी मचाणावर पोलिसाची नेमणूक केली जाते. पण या दिवाळी असो, पालखी असो कि मोहरम असो या मचाणवर मात्र, कधीही पोलिसाची नेमणूक केलेली नसते. पोलिसांशिवाय मचाण उभारण्याचा काय फायदा? त्यामुळे रस्त्यावर नुसती अडचणच होतेय.
 

Web Title: remove stand build for Police if its not used by them