#WeCareForPune जांभुळवाडी तलावाजवळील राडारोडा हटवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे :  जांभुळवाडी येथील जांभुळवाडी तलावाचे थोडे सुशोभिकरण झाले आहे. वॉकिंग ट्रॅकपण तयार केला आहे. वाढत्यावस्तीमुळे नागरिक सकाळ-सांयकाळी येथे  फिरायला येतात. काही सहकुटुंब मुलाबाळांसोबत तरुण-तरुणी सुद्धा फिरायला येतात. मात्र खटकणारी गोष्ट म्हणजे जांभुळवाडी तलावाशेजारी पुणे जिल्हापरिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या बोर्ड जवळ जुने आणि बंद अवस्थेतील रोड रोलर, जुनी जीप, जेसीबी, टँकर धुळखात पडलेला आहे. त्यामुळे या सर्व घाण धुळीमुळे वातावरण प्रदुषित होत आहे. तरी पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने हे अडचण त्वरीत हटविण्याची कार्यवाही करावी. अन्यथा आरटीओ जून्या वाहनांची विल्हेवाट लावावी, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Web Title: Remove trash near jambulwadi lake