धोकदायक झाडांमुळे रहिवाशांच्या जिवितास धोका

मनोज महादेव शेट्टी
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : येरवडा परिसरात मागील अनेक दिवसांपासून वाकड्या तिकड्या आकाराने वाढलेली झाडे पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जनता नगर, येरवडा भाजी मंडई, सुपर टेलर समोरील भाग आणि वंजारे वखारी मागे येथील स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागते आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी आतापर्यंत १३ अर्ज दिले आहेत. तरी देखील वन विभाग अधिकारी कोणतीही दखल घेत नाही. भविष्यात या झाडांमुळे कोणतीही जीवित हानी होऊ शकते. म्हणून वेळीच या भागातील धोकादायक असणाऱ्या सर्व झाडांची छाटणी करावी. तरी पुणे महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे.
 

Web Title: residents life at risk due to dangerous trees