कोंढवे-धावडे बस स्टॅंडचा प्रश्न मार्गी लावा 

विकी अशोक मानकर
Sunday, 18 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुणे महापालिका, स्वारगेट, डेक्कन, मार्केट यार्ड येथून पीएमपीच्या रोज शेकडो बस कोंढवे- धावडे येथे शेवटच्या थांब्याला येतात. पहिल्या या बस नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी (NDA) यांच्या मालकीच्या असलेल्या जागेत थांबत होत्या; पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांना त्या ठिकाणी थांबू दिले जात नाही. शहरातून आलेल्या प्रत्येक बसचालक- वाहकाला कोंढवे- धावडे येथील थांब्याला आराम करण्यासाठी काही मिनिटे वेळ असतो. अशा वेळी जागेअभावी या बस मुख्य रस्त्यावर पार्क केल्या जातात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. तसेच चालक- वाहकाला रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागते.

पर्यायी जागा म्हणून काही दिवसांपूर्वी पीएमपीचे कोंढवे- धावडे व्यवस्थापकांचे ऑफिस गेट येथे आहे. पण अपुऱ्या सुविधांअभावी त्या ठिकाणी व्यवस्थापक बसत नसून रस्त्यावरच उभे राहून व्यवस्थापन केले जाते. कोंढवे- धावडे येथील शेवटच्या बस थांब्याचे स्थलांतर येथे झाले आहे, मात्र प्रवाशांना शेवटचा थांबा म्हणून कोंढवे- धावडे येथे खाली उतरावे लागते. तरी, पीएमपीएल प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर प्रश्न सोडवावा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resolve the question of the Kondhway-Dhavaday bus stand