महापालिकेच्या महसुलाची लूट

एस. के. ओंबळे
Saturday, 17 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे :  कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रालयात बॅटरीवर चालणाऱ्या गाडीतून वेगळे तिकीट काढून फिरवले जाते. परंतू पैसे देऊन तिकीट दिले जात नाही. मशिन चार्जिंगला लावले आहे असे कारण सांगितले जाते. बागेतून फिरून आल्यावरही कोणी तिकीट दिले नाही. मागितल्यावर फक्त तिकीट दिले जाते पण जो तिकीट मागेल त्यालाच फक्त तिकीट दिले जाते. असाच अनुभव पेशवे तलाव बागेतील ट्रेनच्या तिकीटाबाबत देखील आला आहे. तेथेही चार्जिंगचे कारण सांगण्यात आले. तिकीट हवे असल्यास तासभर थांबावे लागेल असे भन्नाट उत्तर देण्यात येते. पुन्हा तिकीटवाढ करण्यात येणार असल्याचे कळते. महसूलाची लूट थांबविल्यास भाडेवाढीची जरूरी भासणार नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revenue loot in Municipal corporation