वारज्यात मांडव-कमानींसाठी रस्ते केले बंद 

राजेश डांगे 
Friday, 23 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 

 

पुणे : वारजे महामार्ग परिसरात दहीहंडीसाठी दोन दिवस शिल्लक असतानाच रस्ते अडवून मोठे मांडव-कमानी उभारून रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. महामार्गावरील पुना बेकरीसमोरील सेवारस्ता, रुणवाल सोसायटीच्या कमानीसमोरील रस्ता, पॉप्युलरनगर रस्ता, कालवा रस्ता हे सर्व रस्ते बंद करून मांडव आणि कमानी घातल्या आहेत. त्यामुळे बाकीच्या रस्त्यावर ताण येऊन प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. हे सर्व काय सुरू आहे? यांना कोण परवानगी देते. महापालिका, पोलिस कोणी याकडे लक्ष देईल का?
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roads closed for Stage-arches in Waraje