#WeCareForPune पाेलिसांची गाडी वन वेमध्ये घुसते तेव्हा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 July 2019

#WeCareForPune

पुणे : सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचा बडगा दाखविणाऱया पोलिसांना मात्र कायद्याचा विसर पडलेला दिसत आहे. नो एन्ट्री, सिग्नल तोडल्यास, हेल्मेट नसल्यास नागरिकांकडून खाकीचा हिसका दाखवून दंड घेतला जातो. मात्र त्याच पोलिसांनी नियमभंग केल्यास त्याच्याकडून दंड वसून कोण करणार. शनिवारवाड्याजवळ अशाच प्रकारे पोलिस अधिकाऱ्याकडूनच नियमभंग करण्यात आला. पोलिस अधिकारी चालवत असलेली गाडी (एमएच 13/ डीई 2323) बुधवारी दुपारी नियम तोडून वन वेमधून जात होती. याबाबत विचारणा केली असता गाडीसोबत उभ्या असलेल्या व्यक्तीने मी जिल्हा पोलिस उपअधीक्षक आहे, समजत नाही का, अशी उद्धट भाषा वापरत उत्तरे दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rules Break from the police