"सावंत विहार' जपतेय सामाजिक बांधीलकी 

सकाळ संवाद
Friday, 17 January 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 

 

"सावंत विहार' जपतेय सामाजिक बांधीलकी 

विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करणारी सोसायटी म्हणजे कात्रज येथील सावंत विहार सोसायटी. 
सामाजिक बांधीलकी जपणारी ही सोसायटी असून, येथे शंभर सदनिका आहेत. सभासदांनी आतापर्यंत 134 सामाजिक उपक्रम राबविले आहेत. 
-अँड. दिलीप जगताप, अध्यक्ष, सावंत विहार सोसायटी 

सर्व सभासद मिळून विविध उपक्रम राबवीत असतात. 2008 मध्ये सोसायटीची स्थापना झाली. सोसायटीच्या प्रवेशद्वारापासून ते शेवटपर्यंत मुलगी वाचवा, तिचा सन्मान करा, झाडे लावा- झाडे जगवा, उत्सव साजरा करताना अनाथ, वंचितांना मदत करा, वाहतुकीचे नियम पाळा, कायद्याचे पालन करून उत्सव, आनंद साजरा करा. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करा असे सामाजिक संदेश देणारे फलक लावण्यात आले आहेत. गणेशोत्सव, शिवजयंती, 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध सामाजिक विषयांवर सदस्यांकडून प्रबोधन केले जाते. या उपक्रमांत येथील तरुणाई, महिला, ज्येष्ठ नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात. 
तरुणांनी मिळून सिद्धिविनायक ग्रुपची निर्मिती केली आहे. कुटुंबाप्रमाणे सोसायटी चालविण्याचा प्रयत्न आहे. सभासदांचे वाढदिवस हे ममता फाउंडेशनमधील एचआयव्ही पीडित मुलांसमवेत साजरे केले जातात. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची दिंडी येथे एक दिवस विसाव्यास असते. कोणत्याही कार्यक्रमात गुलाल, अथवा फटाक्‍यांचा वापर केला जात नाही. आतापर्यंत सोसायटीने 134 सामाजिक उपक्रम राबवले असून, अनेक पुरस्कार सोसायटीला मिळाले आहेत. सोसायटीतर्फे आरोग्य शिबिर, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार असेही उपक्रम राबविले जातात. गेली दहा वर्षे गणोत्सवात विविध सामाजिक विषयांवर देखावा, सजावट, विसर्जन मिरवणुकीत प्रबोधन केले जाते. यासाठी सोसायटीने महापालिकेतर्फे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले आहे. येथे मोफत वाचनालय आहे. नुकतेच जेएसपीएम शिक्षण संस्थेचे संचालक गिरिराज सावंत यांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्‌घाटन झाले. माझ्यासह सोसायटीचे सचिव विनायक महांगडे, खजिनदार पी. एस. जगताप, कार्याध्यक्ष चंद्रकांत कदम, उत्सवप्रमुख रमेश देशमुख, प्रकाश राऊत, पूजा नाईक, युवकांचे कार्यक्रम नियोजक गौरव जगताप आदी सोसायटीचा कारभार सांभाळतात. 

(शब्दांकन : रीना महामुनी-पतंगे

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Sawant Vihar 'To maintain social obligation