बोपगाव एसटीचे वेळापञक सुरळीत करा

दत्तात्रय फडतरे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणुन पुणे जिल्ह्यातील बोपगांव येथील श्री क्षेञ कानिफनाथ गड प्रसिदध आहे. पुणे शहर व जिल्ह्या परिसरातील धार्मिक ठिकाण असल्यामुळे विविध तालुक्यातील भाविक- भक्त पोर्णिमा, गुरुवार, अमावस्या, शासकीय सुटटीच्या व इतर दिवशी दर्शनासाठी व पर्यटनासाठी गडावर येत असतात. परंतु , पुरंदर तालुक्यातील सासवड एटी आगारामधुन सोडण्यात येणारी एसटी बस सहा महिन्यापुर्वीपासुन वेळेवर उपलब्ध होत नाही, त्यामुळे भाविकांची गैरसोय होते.
वीस ते पंचवीस वर्षोपुर्वीपासुन सासवड एसटी आगारातुन सकाळी ११:१५ ला सुटणारी एसटी बस श्री क्षेञ कानिफनाथगड बोपगांव याठिकाणी दुपारी १२:०० वाजता असणाऱ्या नाथांच्या आरतीसाठी पोहचत असे. आरतीनंतर १२:३० ला सासवडला जाण्यासाठी निघत असे.

सहा महिन्यांपुर्वीपासुन सासवड एसटी प्रशासनाने वेळापञकात बदल केल्यामुळे १२ वाजता पोहचणारी एसटी बस कधीही वेळेवर पोहचत नाही व १२:३० च्या अगोदरच श्री क्षेञ कानिफनाथ गडावरुन निघते. जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरुन येणाऱ्या भाविकांची वेळेवर एसटी सेवा नसल्यामुळे मोठी गैरसोय होते.

सातत्याने होत असलेल्या गैरसौयीबद्दल एसटी प्रशासनाकडुन दुर्लक्ष होत आहे. एसटी पुणे विभाग नियंञक, सासवड एसटी आगार व्यवस्थापकांनी तातडीने दखल घ्यावी व वेळापञक पुर्ववत करावे, अशी मागणी भाविकांमधुन होत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: set Convenient Time Zone of Bopgaon ST