अनेक महिन्यांपासून पदपथाचे काम रखडले

नितीन गोडबोले 
Wednesday, 8 January 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : नवी पेठ रामेश्वर अमृततुल्य समोरील पदपथाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. महानगरपालिकेने येथील राडारोडा त्वरित उचलावा आणि काम पूर्ण करावे.

शहरातील कबुतरखाने बंद करा 

नारायण पेठ ः दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत असतानाच आता पुण्य कमवण्यासाठी शहरात ठिकठिकाणी कबुतरांना खाऊ घालण्याचे काम सुरू आहे. परिणामी, दमा, श्वसन, फुफ्फुसांचे आजार वाढत आहेत. कबुतरांच्या विष्ठेच्या कुबट वासामुळे दुर्गंधी पसरत असून, याचा आरोग्यावरदेखील घातक परिणाम होत आहे. त्यांच्या आवाजामुळे निवांत झोप घेणेसुद्धा कठीण झाले आहे. कबुतरप्रेमी याचा विचार करीत नाही. त्यामुळे पुणे शहरातील नदीपात्रात, ओंकारेश्वर मंदिर आदी ठिकाणचे कबुतरखाने बंद करावेत. तसेच यासाठी जनजागृती करावी. 
- अनिल अगावणे 

सातारा रस्त्यावर अतिक्रमण 
बिबवेवाडी ः सातारा रस्त्यावरून सकाळ - संध्याकाळी असंख्य वाहने धावत असतात. ज्येष्ठ नागरिक व इतर पादचारी जीव मुठीत घेऊनच येथून चालतात. रस्त्याच्या दुतर्फा धूळ खात पडलेली अनेक वाहने आहेत. त्याखाली कचरा आणि दलदल झाली आहे. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तसेच येथे भाजीवाले, गॅरेज, मटणाची दुकाने, चहाच्या टपऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच उलट्या बाजूने येणाऱ्या असंख्य वाहनांमुळे चालणेच मुश्‍कील झाले आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे. 
- सुधाकर मराठे 

कात्रज-नवले पुलावर 
विरुद्ध दिशेने वाहतूक 

आंबेगाव ः कात्रज-नवले पुलावर विरुद्ध दिशेने वाहतूक होत आहे. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे. 
- प्रज्ञा बनसोड 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sidewalk was stopped for several months