वैकुंठ स्मशानभूमीतील धुराचा त्रास

सकाळ संवाद
Thursday, 20 February 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

वैकुंठ स्मशानभूमीतील धुराचा त्रास
गेली अनेक महिने दहन झाल्यावर वैकुंठ स्मशानभूमीतील चिमणीतून धूर बाहेर न जाता
विद्युतदाहिनीच्या खालच्या बाजूनेच बाहेर येतो आणि आजूबाजूच्या सोसायटीत पसरतो.
याबाबत अनेकदा महानगरपालिकेत व नगरसेवकांकडे तक्रार करून झाली आहे; पण
कोणीच अद्याप दखल घेतली नाही. 
-अजय रानडे 

फटाके वाजवणाऱ्यांवर कारवाई करा 
पुणे : महापालिकेच्या जवळील 500 मीटर परिघात रोज रात्री 12 वाजता न चुकता
कायद्याचे उल्लंघन करून फटाके वाजवले जातात. हे किमान पाच-सात वर्षे सुरू आहे.
संबंधित विभागाने दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी. 
-ललित खाडिलकर 
 
बेलबाग चौकातील चेंबरचे झाकण खचले 
बुधवार पेठ : लक्ष्मी रोडवरील बेलबाग चौकातील चेंबरचे झाकण खचले असून, या
रस्त्यावरून पीएमपी बस, चारचाकी वाहने, रिक्षा, टेम्पो, दुचाकी वाहनांची वर्दळ दिवस
रात्र असते. तरी महापालिकेच्या संबंधित विभागाने हे खचलेले धोकादायक चेंबरचे झाकण
लवकरात लवकर दुरुस्त करावे. 
-विजय जगताप 
 
बेशिस्त रिक्षाचालकांवर 
दंडात्मक कारवाईची आवश्‍यकता 

कोंढवा : सध्या रिक्षाचे परवाने खुले झाल्यामुळे अनेक नवीन रिक्षांमध्ये वाढ झालेली
आहे. अनेक रिक्षाचालक मनमानी भाडे आकारतात. 
मीटरप्रमाणे पैसे घेत नाहीत, शिवाय मीटरमध्येही काळाबाजार असतोच. अर्थात, काही
रिक्षाचालक प्रामाणिकपणे व्यवसायही करतात. 
रिक्षावाले जनतेला त्रासदायक आहेत अशा रिक्षाचालकांचे परवाने शासनाने रद्द करावेत
किंवा वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई
करावी. 
- अस्लम खान 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smoke disturbance in Vaikunth cemetery