आंबेगांवातील कचऱ्याच्या समस्येचं निवारण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 September 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : आंबेगांव खुर्द येथील जांभुळवाडी रस्त्यावरील सिद्धिविनायक सोसायटी समोरील बस थांबा आणि विवा सरोवर सोसायटीच्या परीसरातील मोकळ्या जागेत अनेक नागरीक कचरा टाकत होते. याबाबत ज्येष्ठ नागरीक संघ, जांभुळवाडी रस्त्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गुरव आणि सकाळ संवाद द्वारे वारंवार पाठपुरावा केला गेला. नंतर त्या भागातील नागरीकांसाठी पुणे मनपाने कचरा उचलण्यासाठी सिद्धिविनायक सोसायटीसाठी घंटागाडीची व्यवस्था केली असल्याचे आरोग्य विभागाने कळवीले आहे. तरी नागरीकांनी इतरत्र कोठेही कचरा न टाकता घंटागाडीतच टाकावा. आपला परीसर स्वच्छ ठेवावा, अन्यथा इतरत्र कचरा टाकणार्यांवर मनपा अस्वच्छतेसाठी दंड आकारु शकते. तरी नागरीकांनी सहकार्य करावे आणि घंटागाडीचा वापर करावा. या भागात घंटागाडी सुरु करण्यात हातभार लावल्या बद्दल दैनिक सकाळ, मनपा अधिकारी यांचे नागरीकांनी आभार व्यक्त केले आहेत.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solution for garbage peoblem at ambegaon into action