#WeCareForPune दिवसभर रस्त्यातील दिवे चालू

- शिवाजी पठारे
Monday, 3 June 2019

कोथरूड : कर्वे रस्त्यावर वारजेकडे जाणाऱ्या लेनवर हुतात्मा राजगुरू चौक (करिश्मा चौक) ते कर्वे पुतळा चौक या दरम्यान रस्त्यावरील दिवे काल शुक्रवारी दिवसभर चालू होते. विजेची व पाण्याची बचत करा असे महानगरपालिका नेहमीच आवाहन करीत असते. पण, दिव्याखाली अंधार या म्हणीला साजेसा कारभार महापालिकेचा असतो.

नेहमीच दिवसाही दिवे लावून लाखो युनीट वीज वाया जाते. तसेच अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जाते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपली मानसिकता बदलली तर नक्कीच हे प्रकार थांबतील. ग्रामीण भागात बारा तास भारनियमण व पंचवीस दिवसांनी पाणी येते ही वस्तुस्थिती आहे. पुणेकर याबाबतीत सुदैवी असतांना अशी बेफिकीरी बरी नाही.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the street lights are on throughout the day