माझी परसबाग ; पु्ण्यात चक्क घराच्या टेरेसवर ऊसाची लागवड

संदीप जगदाळे
सोमवार, 27 एप्रिल 2020

पुणे ः चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड, जास्वंद, अडुळसा, गवती चहा, मिरची, भेंडी, गवार, अळू, कढीपत्ता, मेथी ते गुलाब आदी भाज्या व फुलझाडांचा मळा शेतात नव्हे तर; पुण्यातील गोंधळेनगर मधील योगेश गोंधळे यांच्या घरातील टेरेसवर फुलला आहे.

आवड म्हणून त्यांनी हा मळा स्वकष्टाने जोपासला आहे. यानिमित्ताने किचनमध्ये लागणारा भाजीपाला आपण घरीच निर्माण करू शकतो, हे गोंधळे यांनी सर्वांना दाखवून दिले आहे. तसेच किचनमधील ओला कच-या पासून कंपोस्ट खत देखील ते तयार करतात.   
गोंधळे म्हणाले, या झाडांकरता कोणते ही रासायनिक खत न वापरता फक्त जैविक पद्धतीने झाडे लावली आहेत. खतांमध्ये शेणखत, जीवामृत व कम्पोस्ट खत वापरले जाते. त्यामध्ये घरातील कचरा घरात जिरवला जातो. घरा बाहेरील पाला पाचोळा गोळा करून देखील त्याचे ही खत बनवले जाते, झाडांना फुले जास्त येण्यासाठी कांद्याच्या टरफलांचे पाणी वाफारले जाते. सेंद्रीय खताचा वापर केल्यामुळे भाज्यांना चव देखील चांगली येते. तसेच रासायनिक खतापासून शरिरावर होणारे दुष्परिणाम देखील टळतात. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane cultivation on the terrace in Pune