
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
तळजाई : तळजाई टेकडी परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध कामे सुरू आहेत. तसेच येथे अशास्त्रीय पध्दतीने झाडांची कत्तल सूरू आहे. काही ठिकाणी गेल्या चाळीस एक वर्षांपासून उभी असलेली वनसंपदा जेसीबी सारखी यंत्रे वापरून भूई सपाट करण्याचा सपाटाच लावलेला आहे. तर काही ठिकाणी मोठ-मोठी झाडे, त्यात बरीचशी चंदन पळस हिदेशी झाडे यांची कत्तल झालेली आहे. सिमेंट कॉंक्रिटचाही वापर बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे. तरी जैववैविध्यतेला धक्का लागलेला दिसून येत आहे. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.