#WeCareForPune धायरीत टँकर सम्राटांचा सुळसुळाट

 dhayari.jpg
dhayari.jpg

धायरी : धायरी ग्रामस्थ कित्येक वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड देत आहेत. धायरीत वाटेल त्या दराने सोसायट्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करीत आहेत

एका टॅंकरसाठी सहाशे ते सातशे रुपये दर लावून चढ्या दराने पाणी विक्री करीत आहेत. हाटे चार वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत यांच्या टॅंकरच्या फेऱ्या सुरू असतात. दिवसाला दोनशे ते तीनशे टॅंकरच्या फेऱ्या करून पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल या टॅंकरसम्राटांनी बुडवलेला आहे. याला काही स्थानिक नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा वरदहस्त असल्यामुळे ते कोणालाच जुमानत नाहीत.

पालिकेने रायकर मळा येथे लाखो लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारली, मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन टाकण्याच्या कामात भ्रष्टाचार करून याचे काम अर्धवट सोडून दिले आहे. याचाच गैरफायदा या टॅंकरसम्राटांनी उचलून धायरी, बेनकर वस्ती, गणेशनगर, गारमाळ, रायकरनगर, रायकर मळा आणि महादेवनगर येथील कित्येक सोसायट्यांमध्ये टॅंकर सुरू करून सर्वसामान्यांकडून लाखो रुपये उकळले आहेत. पालिकेने रखडलेल्या पाण्याच्या पाइपलाइनचे काम पूर्ण न केल्यास येत्या काही दिवसांत मराठा मावळा संघटना आणि धायरीतील ग्रामस्थ 'टॅंकर हटाव' आंदोलन करतील, असा इशारा संघटनेच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने पालिकेला देण्यात आला आहे. 

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com