
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.
सिंहगड रस्ता : सिंहगड रस्त्यावर ब्रह्मा हॉटेलजवळ एक महाभाग हेल्मेट डोक्यावर घालण्याऐवजी हातात लटकवल आहे. लोकांना स्वतःच्या डोक्यापेक्षा हाताची काळजी जास्त आहे. हेल्मेटसक्तीमुळे नागरिक हेल्मेट घेवून फिरतात पण त्याचा वापर करत नाही. पोलिस दिसले की तेवढ्यापुर्ते घालायचे. हेल्मेट सक्ती पोलिसांच्या कारवाईपासून बचावासाठी नाहीतर चालकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. हे अशा लोकांच्या केव्हा लक्षात येणार?