पुणे : स्वामी विवेकानंद मार्गावर विविध विकासकामे सुरू असून, त्यासाठी ठिकठिकाणी कामांची माहिती देणारे फलक लावलेले आहेत; परंतु काही फलक चौकांमधील वाहतूक सिग्नलवर लावलेले असल्यामुळे वाहनचालकांना सिग्नलचा अंदाज येत नाही. यामुळे नागरिकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. तसेच, वाहतूककोंडीतही भर पडत आहे.

अण्णा भाऊ साठे पुतळा चौकामध्ये विकासकामाचा फलक लावलेला असून, त्यामुळे बिबवेवाडी गावठाणाकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सिग्नलचा दिवा वाहनचालकांना दिसत नाही. वाहनचालक चौकात सर्वांत पुढे असणाऱ्या वाहनाच्या अंदाजावर वाहने चालवितात. अनेकवेळा चालक रस्त्यावरील वाहतुकीचे नियम डावलून पुढे जातात.
विवेकानंद मार्गाच्या विकासकामांचे फलक नागरिकांना, चालकांना व्यवस्थित दिसतील अशा ठिकाणी लावावेत, त्यामुळे नियम पाळणाऱ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या फलकांमुळे वाहतूक सिग्नल दिसत नसून, पुढे चालणाऱ्या वाहनाच्या अंदाजावर वाहन चालवावे लागत असल्याचे येथील रहिवासी वृषाली डोंगरे यांनी सांगितले.