परिहार चौकात वाहतुक समस्या

चेतन देवरे
गुरुवार, 12 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

औंध : परिहार चौक ते ब्रेमेन चौक दरम्यान रस्त्याचे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुशोभीकरण करण्यात आले. यात रस्त्याचे काँक्रिटिकरण, सुसज्ज पदपथ, सायकल ट्रॅक करण्यात आले. मात्र हे सर्व केल्यानंतर मुख्य वाहतुकीसाठी वाहनांना फक्त एकच लेन उरली आहे. परिणामी अतिशय वर्दळीच्या ह्या परिसरात नागरिकांना प्रचंड वाहतुककोंडीला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात आधीपासुन वाहतुक प्रश्न ऐरणीवर असताना ह्या प्रकल्पामुळे त्यात अधिक भर पडली. यात नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. महापालिकेचा हा प्रकल्प बीआरटी प्रमाणेच पूर्णतः अयशस्वी ठरलेला दिसतो आहे.

स्मार्ट सिटीच्या ह्या प्रकल्पामुळे जंगली महाराज रोड येथेही अशाच प्रकारची वाहतुक समस्या निर्माण झाली प्रशासनाला विनंती आहे कि त्यांनी असा प्रकल्प राबवताना योग्य नियोजन करून मुख्य रस्त्याची रुंदी कमी न करता ती आणखी वाढवावी व त्यानंतर त्याबाजुला सायकल ट्रॅक, सुसज्ज पदपथ उभारावेत. ठिकठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारावेत. तेव्हा पुणे शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट शहर होईल. ब्रेमेन चौक ते पुणे विद्यापीठ हा रस्ता त्याचे उत्तम उदाहरण आहे. (बीआरटी विरहित) माध्यमे व सामाजिक संस्थांनी याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic problems in the Paharhar square