वाहतुक नियंत्रित दिव्यांचा फेरविचार व्हावा

अजित नाडगीर 
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : हडपसर येथील परिवहन स्थानकासमोरील वाहतुक नियंत्रक दिवे हे दिशाभुल करणारे आहेत. हडपसर उड्डाणपुलाखाली वेगवेगळ्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यांचे जाळे पसरले आहे. 

या ठिकाणी पाच रस्ते एकत्र येतात. चार  रस्ते हे समोरासमोर आहेत. एक रस्ता सोलापुर-पुणे, दुसरा सासवड-पुणे, तिसरा पुणे-सोलापुर, चौथा पुणे-सासवड, तर पाचवा रस्ता हा पुणे-सोलापुर व पुणे-सासवड यांना छेद करुन पुढे पुण्याच्या दिशेने जातो. याच पाचव्या छेद रस्त्यावर वाहतुक नियंत्रक दिवे बसवलेले आहेत. येथेच चालकांची संभ्रमावस्था होते. हिरवा दिवा लागला की दोन्ही रस्त्यावरचे चालकाचा गोंधळ होतो. नक्की कोणासाठी हिरवा दिवा लागला हेच समजत नाही कोणाला. वाहतुक नियंत्रक दिवे असे बसवले आहेत की ज्या तज्ञ लोकांनी याची रचना केली आहे तेच कुठला दिवा कोणासाठी हे सांगु शकतील.

यावर उपाय म्हणुन सासवड-पुणे या रस्त्यावरचा वाहतुक नियंत्रक दिवे छेदरस्त्यावरुन काढुन (सासवड रस्त्याच्या बाजुने) २०-२५ मीटर आत घेता येतील. असे केल्यामुळे सासवड-गाडीतळ-पुणे ही रहदारी छेदरस्त्याच्या अलिकडेच नियंत्रित करता येईल. परिणामी गाडीतळ परिवहन आवारात उडालेल्या वाहतुकीकोंडीवर मात करता येईल

Web Title: Traffic signal Should changed