स्वच्छतागृहाजवळ कचऱ्याचा राडारोडा 

​अनिल अगावणे
Monday, 19 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुणे शहरातील अनेक स्वच्छतागृहांजवळ  कचऱ्याचा राडारोडा पडलेला असतो. तसेच स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात. त्यामुळे त्या भागात दुर्गंधी पसरलेली असते.  बुधवार पेठ 970, गवळी आळीतील स्वच्छतागृहाजवळ असाच प्रकार दिसतो आहे. या ठिकाणी महापालिका प्रशासनाने जनजागृतीचा फलक लावलेला आहे. परंतु याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने या ठिकाणी राडारोड्याचा खच पडलेला दिसतो. कारण कचरा टाकण्यासाठी कंटेनर नसल्याने या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. असाच प्रकार शहरभर दिसून येत आहे. 

नुसतेच फलक न लावता नियोजन करुन कारवाई केल्यास असे प्रकार दिसणार नाहीत. यासाठी स्वच्छतागृहे कायम स्वच्छ ठेवा. त्याच्या आजूबाजूला कचरा टाकण्यासाठी मोकळी जागा ठेऊ नका. तेव्हाच आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहील. याचा महापालिका प्रशासनाने, आरोग्य विभाग यांनी गांभीर्याने या विषयावर विचार करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trash debries near the public Toilet