#WeCareForPune रस्ता रुंदीकरण्याच्या नावाखाली सर्रास वृक्षतोड

संतोष ओझा
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

पुणे : वारजे महामार्गावर सेवा रस्त्यावर वारजे चर्च ते शेल पेट्रोल पंप पर्यंत आणि पॉप्युलर नगर परिसरातील सगळी मोठी झाडे महापालिकेकडून शनिवारी तोडण्यात आली आहेत. 40-50 वर्षे जुनी शेकडो झाडे तोडली आहेत. सेवा रस्ता रुंदीकरणाचे कारण सांगत हे दुष्कृत्य करण्यात आले आहे. मुळातच चुकीच्या उड्डाणपूल अन् बायपास रचनेमुळे इथे सेवा रस्ते जॅम होऊ लागले आहेत. विनाकारण उड्डाणपूल अन् बायपासची चूक दुरुस्त करताना आता झाडे तोडून सेवा रस्ता रुंदीकरणाचा नवा घाट घालण्यात येत आहे. काही स्थानिक मंडळी आणि काही सरकारी बाबु मंडळी फक्त कमिशन एजेंटची भूमिका बजावत मलाई मारण्यात व्यस्त आहेत.

पुणे : वारजे महामार्गावर सेवा रस्त्यावर वारजे चर्च ते शेल पेट्रोल पंप पर्यंत आणि पॉप्युलर नगर परिसरातील सगळी मोठी झाडे महापालिकेकडून शनिवारी तोडण्यात आली आहेत. 40-50 वर्षे जुनी शेकडो झाडे तोडली आहेत. सेवा रस्ता रुंदीकरणाचे कारण सांगत हे दुष्कृत्य करण्यात आले आहे. मुळातच चुकीच्या उड्डाणपूल अन् बायपास रचनेमुळे इथे सेवा रस्ते जॅम होऊ लागले आहेत. विनाकारण उड्डाणपूल अन् बायपासची चूक दुरुस्त करताना आता झाडे तोडून सेवा रस्ता रुंदीकरणाचा नवा घाट घालण्यात येत आहे. काही स्थानिक मंडळी आणि काही सरकारी बाबु मंडळी फक्त कमिशन एजेंटची भूमिका बजावत मलाई मारण्यात व्यस्त आहेत. आणि त्यामुळेच या भागात विकासाच्या नावाखाली भकासपणा आलेला आहे. तरी दोषींवर तातडीने कारवाई व्हावी.
 

Web Title: Tree cutting for widening of the road