पुणे : खडकवासला गावातील ओढ्यावरील पुलाचे 23 सप्टेंबरला झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील दुकानेही वाहून गेलेली आहेत. या पुलाच्या कठड्याला उभा असलेला ट्रक धोकादायक अवस्थेत पडलेला आहे. गेल्या दीड महिन्यापासून हा ट्रक त्याच धोकादायक अवस्थेत आहे. येथून पादचाऱ्यांची वर्दळ चालू असते. संबंधित ट्रकमालकाचे तसेच स्थानिक नागरिकांचेही दुर्लक्ष झाले आहे. संबंधित ट्रक येथून त्वरित हटविणे सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे आहे.