कुमठेकर रस्त्यावर अनधिकृत झोपडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

कुमठेकर रस्ता : जोंधळे चौकात रस्त्याच्या बाजूला एक महिन्या आधी एक पत्र्याची झोपडी होती. आता तिथे तीन तीन झोपड्या आहेत. चौकशी केल्यावर ती झोपडी आजूबाजूला फूटपाथ काम करणाऱ्या कामगारांची आहे असे सांगण्यात आले. एक महिन्यापासुन तिथे तीन झोपड्या आहेत. दिवसेंदिवस येथील लोकांची संख्या वाढत आहेत. हे लोक तिथेच शौच, कचरा करतात. तसेच जळणासाठी ढिगानी लाकडं आणली आहेत.

अजून महिनाभर तरी इथेच राहायच्या तयारीत आहेत. त्यांची राहण्याची सोय कॉन्ट्रॅक्टरने केली असेल पण हे चुकीचे आहे. त्यामुळे ट्रॅफिकला ही अडथळा होतो. झोपड्यांमुळे पार्क केलेल्या गाड्या जास्त बाहेर येतात, त्यामुळे बस आल्यावर नेहमी वाहतूककोंड होतो. तरी महापालिकेच्या संबधित विभागाने याकडे लक्ष द्यावे आणि योग्य कारवाई करावी.
 

Web Title: Unauthorized hut on Kumretekar road

टॅग्स