भुयारी पादचारी मार्ग रस्ता अस्वच्छ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पौड रस्ता : पौड रस्त्यावरील नव अजंठा सोसायटीसमोर भुयारी पादचारी मार्ग रस्ता ओलांडण्यासाठी केला आहे. तेथे बेशिस्त नागरिकांनी थुंकुन सगळी भिंत खराब केली आहे. त्यामुळे जेष्ठ नगरिकांना दांडीला धरून चालताना गैरसोय होत आहे. असेच चालू राहिले तर पुणे स्मार्ट सिटी कशी होणार? तरी महापालिकेच्या संबंधित अधिकारी व नगरसेवकांनी लक्ष देऊन लवकरात लवकर स्वछता करुन घ्यावी. तसेच उपाय म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
 

Web Title: Underground pedestrian road is dirty