चेंबरची अशास्त्रीय रचना

अनुप देशपांडे 
मंगळवार, 24 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

वारजे नाका : नारायण ढोकळापासून कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडे जाण्याच्या मार्गावर रस्त्याच्या मधोमध एक चेंबर आहे. बरेच वर्षांपासून हे असेच आहे. आज पर्यंत किती तरी वेळा रस्ता केला असेल पण हे चेंबर रस्त्याच्या मधून हलवून बाजूला केले नाही.

जर चेंबर तसेच ठेवायचे होते तर त्यावर रस्त्याच्या लेवल प्रमाणे धापे टाकून ठेवायला हवे. 5 इंच खोल खड्डा असावा. चेंबर हे अचानक समोर आल्यामुळे एक तर लोक कसाबसा ब्रेक दाबतात किंवा इथे जोरात आदळतात. एखादा मोठा अपघात होण्याआधी योग्य कारवाई करावी. चेंबर रस्त्याच्या बाजूला तरी करावे किंवा त्याची लेवल तरी समप्रमाणात असावी. महापालिकेच्या संबधित विभागाने याकडे लक्ष द्यावे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unscientific chamber