esakal | पुण्यात घरात फुलला भाजीचा मळा
sakal

बोलून बातमी शोधा

UPN20A14207 11.jpg

पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच भाजी व उपयुक्त झाडे लावली आहेत. त्यामुळे लाॅकडाउनमध्ये भाजीपाल्यासाठी त्यांना जास्त घराबाहेर पडावे लागत नाही.

पुण्यात घरात फुलला भाजीचा मळा

sakal_logo
By
महादेव पवार

पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच भाजी व उपयुक्त झाडे लावली आहेत. त्यामुळे लाॅकडाउनमध्ये भाजीपाल्यासाठी त्यांना जास्त घराबाहेर पडावे लागत नाही.

गच्चीवर त्यांनी वांगी, मिरच्या, पुदिना, शेवगा, कोथिंबीर, गवती चहा, खायची पाने, अळूची पाने, कढीपत्ता, कोरफड, अळू, तुळस, कारली, भोपळा, ओव्याची पाने, चाफा, गुलाब आदी विविध प्रकारची झाडे लावून जणू छोटी बागच साकारली आहे. या बागेसाठी ते कोणतेही रासायनिक खत वापरत नाहीत. तर यासाठी घरातील ओल्या कचऱ्यापासून ते खत निर्मिती करतात. तसेच, शेणखताचा देखील वापर करतात.
आठवड्यातून एकदा खुरपणी केली जाते. त्यामुळे भाजीपाला उत्तम दर्जाचा येतो. तसेच खुरपणी करून शेणखत टाकले जाते. उन्हाळा असल्याने दिवसातून दोन वेळा पाणी दिले जाते. 
सध्या शहरात लॉकडाउन असल्यामुळे या बागेतील भाजीचा उपयोग खूप होत आहे. शिवाय झाडांवरील भाज्या हातानेच काढत असल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा प्रश्नच नाही, असे फाटक यांनी सांगितले.