
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
पुणे : ढिसाळ नियोजनाचा उत्तम नमुना म्हणजे पौड रस्त्यावरील मेट्रोचे काम. पादचाऱ्यांना येण्या-जाण्यासाठी यांनी पदपथावर जागाच ठेवली नाही. त्या ठिकाणी मोठे पाईप, बॅरिकेडस्, बसेस, मेट्रो कार्यालये यांनीच जागा व्यापली आहे. माझ्या सारख्या सामान्य माणसाला पंख असते तर पौड रोड 'वरून' येता-जाता कौतुकाने पुष्पवृष्टी केली असती. पण सध्या तरी हे शक्य नाही, तेंव्हा फुटपाथ तरी मोकळे करा.