वनाज : कॉर्नर चौकात उठ की सुट कोणीही होर्डिंग चिटकवत असतो. या होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहेत. कोथरूड भागातील पुणे महापालिकेचे अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष का करतात? हा आश्चर्यात टाकणारा प्रश्न आहे. संपुर्ण कोथरूड परिसर या रिकामटेकड्या होर्डिंग सम्राटांनी आणि सम्राज्ञींनी विद्रूप करून टाकला आहे. प्रभाग अधिकारी हे काम करत नसतील तर पालिकेच्या मुख्यालयातून कर्मचारी पाठवून हे होर्डिंग काढावेत. तसेच, कामचुकार अधिकाऱ्यांची बदली करावी अथवा महापालिका सेवेतून निलंबित करावे. अशाच कारणामुळे स्वच्छता क्रमवारीत मागच्या वर्षी पुण्याची देशपातळीवर पिछेहाट झाली आहे.