स्मार्ट डिसप्लेंचा उपयोग काय ?

गणेश चव्हाण
बुधवार, 2 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

कोथरूड : पुणे स्मार्ट सिटी कंपनीने शहरभर स्मार्ट डिसप्ले लावलेले आहेत. जे १० फुट अंतरावरूनही दिसत नाहीत. आज कोथरूड येथे डिसप्लेच्या एक फुट अंतरावरून जी माहिती वाचली ती लोकांच्या काही कामाची नाही. कुठलातरी पुरस्कार मिळाला म्हणून हे लोक स्वतःचेच अभिनंदन करत आहेत. एकतर गुणवत्ता पुर्ण डिसप्ले लावून लोकोपयोगी माहिती दाखवा अन्यथा निधीचा अपव्यय थांबवा. गल्ली बोळातील होर्डिंग आणि स्मार्ट डिस्प्ले यांमध्ये काहीतरी फरक असायला हवा.

 

Web Title: What is the use of Smart Displays?