'अभिनव बाक' बांधुन पैशाचा अपव्यय कशासाठी ?

मेघना कुलकर्णी 
बुधवार, 13 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : तुऴशीबागवाले कॉलनीमधील विस्तीर्ण मैदानाबाहेरील एका कोपऱ्यावर पालिकेने नुकतेच मोठमोठ्या लोखंडी खांब कोनाकार रीतीने लावून त्याखाली सिमेंटचा बाक बांधला आहे. खर्चिक बांधकाम कशासाठी केलंय समजत नाही आणि केले तरी त्याची योग्य जपणुक मात्र केली जात नाही. कारण त्यालगत कचऱ्याचे ढीग साचले असतात, बाकावर कुत्री झोपतात. हे 'अभिनव बाक' बांधुन पैशाचा अपव्यय  कशासाठी? 

Web Title: Why waste money by building 'innovative bench'?