ग्रामीण भागातील महिलांसाठी  मोफत बससेवा मिळावी 

ग्रामीण भागातील महिलांसाठी  मोफत बससेवा मिळावी 

ग्रामीण भागातील महिलांसाठी 
मोफत बससेवा मिळावी 

खडकवासला : कुडजे, आगळंबे, खडकवाडी, मांडवी बहुली, सांगरून या ग्रामीण भागातील अनेक गावांतील मुली शिक्षणासाठी कर्वेनगर, एसएनडीटी, शिवणे येथे येत-जात, असतात. या भागातील बऱ्याच कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. येथील अनेक कुटुंबे शेती आणि दुग्ध व्यवसाय करून पोट भरतात. तसेच मुली घरामध्ये आणि शेतामध्ये आई-वडिलांना कामामध्ये मदत करून शिक्षणसुद्धा पूर्ण करतात. शहरातील मुलींना खूप सुखसुविधा मिळतात; परंतु ग्रामीण भागामध्ये गरीब कुटुंब असल्यामुळे मुलींना बस खर्चालासुद्धा पैसे नसतात. तसेच बऱ्याच स्त्रियांना गरीब परिस्थितीमुळे नोकरीसाठी शहरात यावे लागते, त्यांनासुद्धा मोफत बससेवा मिळावी. बससेवा मोफत मिळाल्यास ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण नक्कीच वाढेल. कारण गरीब परिस्थितीमुळेच मुली अर्धवट शिक्षण सोडतात. दुसऱ्या राज्यात मुलींचा जन्मापासून लग्नापर्यंतचा संपूर्ण खर्च सरकार करते. आपण फक्त बससेवा मोफत दिली, तरी खूप बर होईल. मोफत बससेवा मिळाल्यास स्त्रियांचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल आणि त्यांचा प्रवाससुद्धा सुरक्षित होईल. 
- दत्ता पायगुडे 


मोफत नको, वाजवी दराने पुरेसा वीजपुरवठा करा 
आता नवीन टूम निर्माण करून ग्राहकांना गाजर दाखविणार. राज्यात दरमहा शंभर युनिट मोफत घरगुती वीज देणार, असे वाचनात आले. मुळात सामान्यांना फुकट वीज नकोच आहे. कोणीही मागणी केलेली नाही. नियमित वीजपुरवठा करा आणि योग्य बिल आकारणी करा, एवढीच अपेक्षा आहे. राज्यात महावितरण तोट्यात असताना मोफत वीजपुरवठा कसे शक्‍य आहे? यापेक्षा राज्यात जे नागरिक अनेक वर्षे मोफत वीज वापरतात त्यांना शोधण्यासाठी कारवाई करा, दंड आकारा आणि तूट भरून काढा. 
- नीलम सांगलीकर 


पीएमपी बससेवा सुरळीत करा 
पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात पीएमपी, ही शहराची महत्त्वाची रक्तवाहिनी आहे. साधारणतः रोज सुमारे 11 लाख प्रवासी पीएमपीने प्रवास करत असतात. तथापि गेल्या काही वर्षांपासून ती अधिकच गाळात रुतत चालली आहे. कुठेही बंद पडणाऱ्या बस, अखेरच्या घटका मोजत असलेल्या बस, तुटलेल्या-फुटलेल्या व 
गुण्यागोविंदाने न मिटणाऱ्या खिडक्‍या, विविध मार्गांवरील बसच्या वारंवारीतेतील अनियमितता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे काही अपवाद वगळता कर्मचाऱ्यांचे बेशिस्त व मनमानी वर्तन! त्यात भर पडली स्मार्ट कार्डला दाद न देण्याऱ्या तिकीट मशिनची. अनेकदा त्यातून तिकीटच बाहेर येत नाही. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमध्ये वाहक व प्रवासी दोघांचीही कुचंबणा होते. त्यामुळे अनेकदा फुकट्या प्रवाशांचे फावते. तिकीट तपासणीसही योग्य शहानिशा न करता चोर सोडून संन्याशालाच 
बळी देतात. स्मार्ट कार्ड दाखवूनही तिकीट नसल्यास प्रवाशांकडून दंड वसूल केला जातो. 
या सर्व पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासन, वाहक, चालक, चेकर, प्रवासी या सर्व घटकांत एकवाक्‍यता आल्यास रोजच्या प्रवाशांचा प्रवास आनंदी, सुखावह होऊ शकतो. 
- एकनाथ लंघे 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com