
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
पुणे : डेक्कन जिमखाना, खंडोजी बाबा मंदिरा जवळ नव्याने बांधून सुद्धा वापरासाठी बंद असलेल्या ई-टॉयलेटची दुर्दशा झाली आहे.महिलांसाठी स्वच्छतागृहे असावीत, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पुढाकार घेऊन शहरामध्ये प्रशस्त 'ई-टॉयलेट'ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या 'टॉयलेट'च्या सुविधेसाठी पाच रुपये शुल्क ठेवले आहे. म्हणजे लघुशंकेसाठी सुद्धा पाच रुपये मोजावे लागत आहे.
गर्दीच्या, वर्दळीच्या असलेल्या ठिकाणी हे टॉयलेट बांधण्यात आली आहेत. त्यामुळे महिलांना या टॉयलेटचा वापर करण्यासाठी नक्कीच संकोच वाटणार, याचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला नाही. शिवाय अनेक ठिकाणी या टॉयलेटची जागा बांधून झाल्यानंतर दोन-तीन वेळा पाडून पुन्हा नव्याने बांधले आहेत. स्मार्ट सिटीच्या शहरांमध्ये स्वच्छतागृहांचा वापर मोफतच असला पाहिजे.