Coronavirus : महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा रद्द

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 एप्रिल 2020

कोरोना विषाणूंमुळे जगभरात लॉकडाउन असताना युरोपमधील परिस्थिती आणखीनच बिकट बनत चालली आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा रद्द करण्याची वेळ संयोजकांवर आली आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा तसेच ७ जूनपर्यंतच्या सर्व स्पर्धा रद्द झाल्यामुळे आता ऑल इंग्लंड क्लबकडे नैसर्गिक हिरवळीवर होणारी ही एकमेव ग्रँडस्लॅम स्पर्धा रद्द करण्यावाचून पर्याय नव्हता. त्यामुळे ही स्पर्थादेखिल रद्द करण्यात आली आहे.
 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंमुळे जगभरात लॉकडाउन असताना युरोपमधील परिस्थिती आणखीनच बिकट बनत चालली आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा रद्द करण्याची वेळ संयोजकांवर आली आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा तसेच ७ जूनपर्यंतच्या सर्व स्पर्धा रद्द झाल्यामुळे आता ऑल इंग्लंड क्लबकडे नैसर्गिक हिरवळीवर होणारी ही एकमेव ग्रँडस्लॅम स्पर्धा रद्द करण्यावाचून पर्याय नव्हता. त्यामुळे ही स्पर्थादेखिल रद्द करण्यात आली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

२८ जूनपासून ही स्पर्धा सुरू होणार होती. मात्र संपूर्ण जग कोरोनासारख्या भीषण परिस्थितीचा सामना करत असताना ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय संयोजकांडून घेण्यात आला आहे. काल (ता. ०१) याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. कोरोनामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले असताना ऑल इंग्लंड क्लबचे मुख्य मंडळ तसेच व्यवस्थापन समिती ही स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा करत असल्याचे ऑल इंग्लंड क्लबने म्हटले आहे.

 

ऑल इंग्लंड क्लबने एक पत्रक काढून म्हटले आहे की, ब्रिटनमधील जनता, परदेशातून येणारे चाहते तसेच खेळाडू, पाहुणे, सदस्य, कर्मचारी, स्वयंसेवक, कंत्राटदार यांच्या आयुष्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याचबरोबर समाजाचे हित जपण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही ही स्पर्धा रद्द करत आहोत. तिकीट विकत घेतलेल्यांचे सर्व पैसे परत केले जातील अथवा पुढील वर्षी त्याच दिवशीचे तिकीट त्यांना दिले जाईल. सर्व तिकिटधारकांशी आम्ही वैयक्तिकपणे संपर्क साधणार असल्याचेही ऑल इंग्लंड क्लबच्या पत्रकात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2020 Wimbledon Championship Cancelled