Coronavirus : महाराष्ट्राचा आकडा २४५५वर; आज कोठे किती वाढले रुग्ण?

वृत्तसंस्था
Tuesday, 14 April 2020

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आज (ता. १४) दुपारपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा १२१ने वाढला आहे. महाराष्ट्रात आज १२१ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने १२१ रुग्ण आढळल्याने आता महाराष्ट्रात एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २४५५ इतकी झाली आहे.

मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आज (ता. १४) दुपारपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा १२१ने वाढला आहे. महाराष्ट्रात आज १२१ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने १२१ रुग्ण आढळल्याने आता महाराष्ट्रात एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २४५५ इतकी झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. काल उशिरापर्यंत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या २३३४ होती. त्यामध्ये १२१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ही संख्या २४५५ झाली आहे. महाराष्ट्राच्या चिंते भर घालणारीच ही बातमी ठरली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

कोठे किती वाढले रुग्ण?

  • मुंबई : ९२
  • नवी मुंबई : १३
  • रायगड : ०१
  • ठाणे महानगरपालिका आणि मंडळ : १०
  • वसई विरार : ०५
  • एकूण : १२१

दरम्यान, महाराष्ट्रात करोनाची लागण झाल्याने २४५५ बाधित आहेत. तर १५५ पेक्षा जास्त रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांचा विचार केला तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवला गेला असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारीच केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाउन हा ३ मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही ३ मे पर्यंत लॉकडाउन असणारच आहे हे उघड आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 121 new COVID19 positive cases reported in the Maharashtra today