Coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८६८; आतापर्यंत तपासले एवढे नमुने

868 people affected by coronavirus in maharashtra says Rajesh Tope
868 people affected by coronavirus in maharashtra says Rajesh Tope

मुंबई : महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ८६८ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ७० रुग्णांना सोडले घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आज (ता. ०६) कोरोनाच्या १२० नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ८६८ झाली आहे. ७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात आतार्यंत पाठविण्यात आलेल्या १७ हजार ५६३ नमुन्यांपैकी १५ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर ८६८ जण पॉझिटिव्ह आले असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून ही राज्यासाठी चिंताजनक बाब आहे. जगभरात आणि देशात करोना व्हायरसने थैमान घातलेले असताना महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक असून देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त हे महाराष्ट्रात आहेत. यामध्ये मुंबईने तर ५००चा आकडा पार केला आहे.

दरम्यान, जगभरातील मृतांची संख्या ७३ हजार ७५० वर पोहोचली आहे. दरम्यान जगभरात १३ लाख २८ हजार १५० जणांना करोनाची लागण झाली आहे. यापैकी दोन लाख लोकांना उपचार करुन घरी पाठवण्यात आलेलं आहे. दुसरीकडे भारतात ४७७८ लोकांना करोनाची लागण झाली असून मृतांची संख्या १३६ वर पोहोचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com