Coronavirus : महाराष्ट्राचा आकडा २८०१वर; आज कोठे किती वाढले रुग्ण?

coronavirus 117 new cases recorded today in the Maharashtra state
coronavirus 117 new cases recorded today in the Maharashtra state

मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आज (ता. १५) दुपारपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ११७ने वाढला आहे. महाराष्ट्रात आज ११७ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने ११७ रुग्ण आढळल्याने आता महाराष्ट्रात एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २८०१ इतकी झाली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. काल उशिरापर्यंत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या २६८४ होती. त्यामध्ये ११७ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ही संख्या २८०१ झाली आहे. महाराष्ट्राच्या चिंते भर घालणारीच ही बातमी ठरली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

कोठे किती वाढले रुग्ण?
मुंबई : ६६
मीरा भायंदर : ०२
पिंपरी चिंचवड : ०१
पुणे : ४४
ठाणे महानगरपालिका आणि मंडळ : ०३
वसई विरार : ०१
एकूण : ११७

दरम्यान, महाराष्ट्रात करोनाची लागण झाल्याने २८०१ बाधित आहेत. तर १५५ पेक्षा जास्त रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांचा विचार केला तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवला गेला असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारीच केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाउन हा ३ मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही ३ मे पर्यंत लॉकडाउन असणारच आहे हे उघड आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com