गुड न्यूज : राज्यातील २६ ‘कोरोना’रुग्ण बरे होऊन घरी; सध्या कोठे किती रुग्ण?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

राज्यात कोठे किती रुग्ण?
मुंबई - ७३ 
सांगली - २४ 
पुणे मनपा - २४ 
पिंपरी चिंचवड मनपा - १२ 
नागपूर - ११ 
कल्याण - डोंबिवली - ७ 
नवी मुंबई - ६ 
ठाणे - ५ 
यवतमाळ, वसई विरार प्रत्येकी - ४ 
नगर - ३ 
सातारा, पनवेल प्रत्येकी - २ 
उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया प्रत्येकी - १

पुणे - राज्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले २६ रुग्णांवर यशस्वी उपचारांमुळे खडखडीत बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये शनिवारी आणखी २८ रुग्णांची भर पडली. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या १८१ झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे आहेत. तर, दोन रुग्ण नागपूर येथील आहेत. इतर ४ रुग्ण पालघर - वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत. पुण्यात तीन जणांना कोरोनाचे निदान झाले. कोरोनाचा संसर्ग झालेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या १०४ रुग्णांना आजाराची कोणतेही लक्षण नाही. तर, ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान काल मुंबईत ज्या डॉक्टरांचा मृत्यू झाला तो कोरोनामुळे झाल्याचे आज निश्चित झाले. यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ६ झाली आहे.

मोदींची जाहीर केलेल्या पीएम केअर्सला करू शकता मदत; वाचा कोणाची किती मदत

राज्यात कोठे किती रुग्ण?
मुंबई - ७३ 
सांगली - २४ 
पुणे मनपा - २४ 
पिंपरी चिंचवड मनपा - १२ 
नागपूर - ११ 
कल्याण - डोंबिवली - ७ 
नवी मुंबई - ६ 
ठाणे - ५ 
यवतमाळ, वसई विरार प्रत्येकी - ४ 
नगर - ३ 
सातारा, पनवेल प्रत्येकी - २ 
उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया प्रत्येकी - १


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus maharashtra update 26 patient discharged from hospital