Coronavirus : महाराष्ट्र राज्यात रूग्णसंख्या वाढण्याचा धोका

योगिराज प्रभुणे
Thursday, 9 April 2020

राज्यात रुग्णसंख्या जाणार चार लाखांवर 
राज्यात पुढील ६८ दिवसांमध्ये म्हणजे १५ जूनपर्यंत कोरोनाचा संसर्गाचे रुग्ण चार लाख ९० हजार होतील अशी शक्यता ‘एसईआयआर’ प्रारुपाच्या आधारावर वर्तविली आहे. त्यापैकी ५ टक्के रुग्णांना उपचारांसाठी आयसीयूमध्ये दाखल करावे लागेल. त्यांची संख्या सुमारे ८० हजार असेल. आयसीयूची गरज नसणाऱ्या पण, उपचारांसाठी रुग्णालयातच भरती कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या दोन लाख ४५ हजार असेल, असेही यात नमूद केले आहे. राज्याच्या दृष्टीने दोन महिने आव्हानात्मक आहेत.

‘एसईआयआर’ प्रारूपाच्या आधारावर सरकारी आरोग्य यंत्रणांचा अंदाज 
पुणे - आगामी दोन महिन्यांत कोरोनाचा संसर्ग किती वेगाने वाढेल, याचा वेध ‘एसईआयआर’ (सस्पेक्‍टीबल-एक्‍स्पोजर, इन्फेक्‍शिअस, रिमुव्हड ऑर रिकव्हर्ड) या प्रारुपाच्या आधारावर सरकारी आरोग्य यंत्रणांनी घेतला आहे. त्यानुसार १५ जूनपर्यंत राज्यातील रूग्णसंख्या चार लाख ९० हजार होण्याची शक्‍यता आहे तर पुण्यात हा आकडा चाळीस हजाराच्या घरात असेल. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात रुग्णसंख्या जाणार चार लाखांवर 
राज्यात पुढील ६८ दिवसांमध्ये म्हणजे १५ जूनपर्यंत कोरोनाचा संसर्गाचे रुग्ण चार लाख ९० हजार होतील अशी शक्यता ‘एसईआयआर’ प्रारुपाच्या आधारावर वर्तविली आहे. त्यापैकी ५ टक्के रुग्णांना उपचारांसाठी आयसीयूमध्ये दाखल करावे लागेल. त्यांची संख्या सुमारे ८० हजार असेल. आयसीयूची गरज नसणाऱ्या पण, उपचारांसाठी रुग्णालयातच भरती कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या दोन लाख ४५ हजार असेल, असेही यात नमूद केले आहे. राज्याच्या दृष्टीने दोन महिने आव्हानात्मक आहेत.

पुण्यात दोन हजार रूग्ण असतील ‘आयसीयू’ त 
पुण्यातील पेठा सील केल्या जात आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडूच नये, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. पुण्यात ‘बेस्ट केस’नुसार १५ जूनपर्यंत रुग्णांची संख्या ४० हजारपर्यंत वाढेल. त्यात दोन हजार रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागणार असल्याचा अंदाज असून, सहा हजार रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात ठेवावे लागेल, असेही यात स्पष्ट केले आहे. 

त्यामुळे रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिका, वैद्यकिय उपकरणे आणि तंत्रज्ञ यांची पुरेशा प्रमाणात उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे.

‘आर-नॉट’ कमी करण्याचे आव्हान
साथीच्या रोगाचा उद्रेक मोजण्यासाठी ‘आर-नॉट’ या पद्धत वापरतात. लॉकडाऊन नसते तर एक रुग्ण महिन्याभरात किती रुग्णांपर्यंत विषाणूंचा फैलाव करू शकतो, हे ‘आर-नॉट’वरून मोजता येते. राज्यात सध्या ‘आर-नॉट’ १.८ ते २.५ दरम्यान असल्याचे या अहवालात आहे. या आधारावर राज्यात एक रूग्ण ४६५ जणांना महिनाभरात कोरोनाचा संसर्ग करू शकतो. सामाजिक अंतर आणि घरात बसून हे प्रमाण कमी केल्यास नजीकच्या भविष्यात होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण निश्‍चित कमी होईल, असा विश्‍वासही साथरोग तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus patient growth in Maharashtra Danger