राज्यातील नागरिकांचे स्थलांतर थांबविण्याचे निर्देश

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 मार्च 2020

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज राज्यातील सर्व सहा विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा करून कोरोनापासून करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. प्रत्येक विभागातील कोरोना विषाणू संक्रमण व नागरिकांच्या स्थलांतराबाबत त्यांनी माहिती घेतली. कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातून इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या नागरिकांना ते जेथे असतील, तेथे थांबविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे, अशी सूचना राज्यपालांनी विभागीय आयुक्तांना केली.

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज राज्यातील सर्व सहा विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा करून कोरोनापासून करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. प्रत्येक विभागातील कोरोना विषाणू संक्रमण व नागरिकांच्या स्थलांतराबाबत त्यांनी माहिती घेतली. कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातून इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या नागरिकांना ते जेथे असतील, तेथे थांबविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे, अशी सूचना राज्यपालांनी विभागीय आयुक्तांना केली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्व मोठ्या शहरांमध्ये आणि औद्योगिक वसाहतींमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर करीत असलेल्या नागरिकांना थांबण्याचा आग्रह करावा व त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी सरकारी-निमसरकारी संस्था करीत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना माहिती द्यावी, असे राज्यपालांनी सांगितले. ज्या जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांमधून किंवा इतर जिल्ह्यांमधून नागरिक प्रवेश करीत आहेत, त्यांनादेखील थांबवून घेऊन त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instructions to stop migration of citizens of the maharashtra state