#WeVsVirus : सकाळ डिजिटल हॅकेथॉन; सहभागी व्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

आपण सहभागी होऊ शकता, जर आपल्याकडे...

 • इंटरनेट आणि ई मेल आहे.
 • नावीन्यपूर्ण संकल्पना आहे.
 • संकल्पना अंमलबाजणीयोग्य आहे.
 • संकल्पनेला शास्त्रीय आधार आहे.

कोरोना विषाणूच्या संकटावर संघटितपणे मात करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहाने’ समाजातील सर्व घटकांसाठी WeVsVirus डिजिटल हॅकेथॉन आयोजित केली आहे. महाराष्ट्राला आणि पर्यायाने देशाला देण्यासाठी अंमलबजावणी योग्य नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन पुढे येण्याचे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नावीन्यपूर्ण संकल्पनेवर मॅरेथॉन धावल्यासारखे सलगपणे काम करणे म्हणजे हॅकेथॉन. हॅकेथॉन प्रामुख्याने तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक वापरले जाते. समस्यांवर सामूहिक उत्तरे जलद शोधण्याची ही सामूहिक पद्धती जगभर आज वापरली जाते. #WeVsVirus  डिजिटल हॅकेथॉनमधून अशा संकल्पना अपेक्षित आहेत, ज्या वापरून तात्कालीन आणि भविष्यात येऊ घातलेल्या समस्यांवर मात करता येईल. 

भारतासह जगातील रोगांच्या साथी

आपण प्रायोजक बनू शकता, 
जर आपल्याला...

 • नावीन्यपूर्ण संकल्पनांना पाठबळ द्यायचे असेल.
 • अशा संकल्पनांना प्रत्यक्ष रूप द्यायचे असेल.
 • संकट निवारणात सहभाग द्यायचा असेल.
 • कंपनी म्हणून सामाजिक जबाबदारी वाटत असेल.

आपण तज्ज्ञ आहात...? 
आम्हाला कळवा...

 • आपले क्षेत्र, त्यातील आपला अनुभव
 • योगदान देण्याची इच्छा असलेले क्षेत्र
 • हॅकेथॉनमध्ये भाग घेणाऱ्यांना होणारा संभाव्य उपयोग

आमच्याशी संपर्क करा 

 • ई मेल करा : support@esakal.com 
 • WhatsApp : ९१३०० ८८४५९

अशा नावीन्यपूर्ण संकल्पना मांडा
पुण्यातील सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्कने (एसटीपी) ‘निगेटिव्ह आयन जनरेटर’ तयार केला आहे. पृष्ठभागावरील जीवाणू आणि विषाणूंचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्याचा वापर करता येईल का, यावर संस्था संशोधन करीत आहे. पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे म्हणाले, ‘‘जगभरामध्ये निगेटिव्ह आयनचा वापर विविध पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी केला जात आहे. निधी प्रयास कार्यक्रमांतर्गत तयार केलेला ‘सायटेक एअरॉन एअर प्युरिफायर’ सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्यासाठी यशस्वी ठरला आहे. पुण्याच्या डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये असे चार प्युरिफायर बसविले आहेत.’’ कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी हा प्युरिफायर किती उपयोगात येईल, यासंबंधी निरीक्षणे घेण्याचे प्रयोग सध्या चालू आहेत.

क्षमतेनुसार सहभागी व्हा!
आजच्या अभूतपूर्व परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकाने परस्परांच्या सहकार्यासाठी पुढे आले पाहिजे. हॅकेथॉनमध्ये सहभाग म्हणून आपण जशा संकल्पना मांडू शकता; तसेच प्रायोजकत्व, डोनेशनच्या माध्यमातूनही सहभाग नोंदवू शकता. समाजातील प्रत्येक घटकाला आपापल्या आर्थिक कुवतीनुसार सहभागी होता येणार आहे. याबद्दलचा तपशील वेळोवेळी ‘सकाळ’ आणि www.esakal.com वर जाहीर होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Join a digital hackathon in the sakal