Coronavirus : पॉलिसीधारकांसाठी एलआयसीचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 April 2020

कोरोनामुळे जगाबरोबरच भारतालाही मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. एलआयसीच्या ’योगक्षेमं वहाम्यहम्‌’ या ब्रीद वाक्‍यानुसार तुमचे कल्याण ही आमची जबाबदारी आहे.
- एम.आर.कुमार, एलआयसीचे अध्यक्ष

पुणे - देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) पॉलिसीधारकांना होणा-या अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मार्च आणि एप्रिल २०२० मध्ये प्रीमियम देय असणाऱ्या सर्व पॉलिसींसाठी एक महिन्यांची अतिरिक्त मुदत दिली आली आहे. फेब्रुवारीमधील प्रीमियम जो २२ मार्चपर्यंत देय अशांना देखील प्रीमियम भरण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत सवलत देण्यात आली आहे.

’एलआयसी’चे पॉलिसीधारक कोणत्याही सेवा शुल्काशिवाय ’एलआयसी’च्या कोणत्याही डिजिटल पेमेंट पर्यायांद्वारे प्रीमियम भरू शकणार आहे. पॉलिसीधारकांना प्रीमियम भरण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करण्याची आवश्‍यकता नाही. पॉलिसीसंबंधित प्राथमिक तपशील देऊन थेट पैसे भरू शकणार आहे. ’एलआयसी पे डायरेक्‍ट’ या मोबाइल ॲपच्या माध्यमातून देखील प्रीमियम देता येतील. तसेच नेट बॅंकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि पेटीएम / फोन पे / गूगल पे / भीम / यूपीआय इत्यादी पेमेंट ॲपद्वारे देखील प्रीमियम स्वीकारले जातील. सर्व आयडीबीआय आणि ॲक्‍सिस बॅंक शाखांमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे रोख स्वरूपात देखील प्रीमियम भरता येतील.

एलआयसीने एलआयसीने पाच योजना देखील ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत. ज्या घरबसल्या सहज ऑनलाईन माध्यमातून घेता येणार आहेत. एलआयसीच्या ग्राहकांना कोविड १९ संबंधित सर्व माहिती तसेच पॉलिसीसंबंधित सर्व माहिती https://licindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LIC initiative for policy holders