गावांमध्ये "नो एंट्री'; प्रवेशद्वारांचे रस्ते दगड, फांद्या टाकून बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

"कोरोना 'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंबेगाव व शिरूर तालुक्‍यातील अनेक गावांनी स्वतःहून पुढाकार घेऊन रस्त्यावर दगड व झाडाच्या फांद्या टाकून रस्ते बंद केले आहेत.

मंचर  -"कोरोना 'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंबेगाव व शिरूर तालुक्‍यातील अनेक गावांनी स्वतःहून पुढाकार घेऊन रस्त्यावर दगड व झाडाच्या फांद्या टाकून रस्ते बंद केले आहेत. पुणे- मुंबईच्या नागरिकांनी आपल्या गावात येऊ नये, असा संदेश पोचविण्याचे काम गावकरी करत आहेत. गावांनी लागू केलेल्या या गावबंदीचे स्वागत होत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या तळेघर, म्हतारबाचीवाडी, कोंडवळ येथे गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर झाडाच्या फांद्या व दगड लावले आहेत. मेघुली, जांभोरी, कुशिरे, कोंढरे, बोरघर, आहुपे येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर झाडांच्या फांद्या आडव्या टाकल्या आहेत. त्यावर "प्रवेश बंद' असा मजकूर लिहिला आहे; तर आसाणे येथील मेनुंबरवाडीत रस्त्यावर दगड टाकून "प्रवेश बंद' असे लिहिले आहे. 

राज्य सरकारने कलम 144 प्रमाणे जमावबंदी व संचारबंदी लागू केली आहे. मंचर व घोडेगाव पोलिस वाहनावरील सायरन वाजवत जनजागृती करत आहेत. पण, काही मंडळी प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी आता गावबंदीचे पाऊल उचलले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No entry in the villages