आता वृद्धांना मिळणार घरपोच पेन्शन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

टपाल विभागाची कामगिरी

  • २०० गरजू व्यक्तींना मोफत जेवण 
  • सहा टन वैद्यकीय उपकरणे पोचवली
  • एक हजार वैद्यकीय उपकरणे देशभरातील रुग्णालयात वितरित केली
  • कोरोना चाचणीचे चेन्नईहून आलेले साहित्य, तसेच अमेरिकेमधून आवश्‍यक यंत्रणा पुण्यातील रुग्णालयात रवाना

मुंबई - दर महिन्याच्या सुरुवातीला निवृत्तिवेतन काढण्यासाठी टपाल कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागतात; मात्र सध्या कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत टपाल खात्यानेही ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तिवेतन घरपोच देण्याची सुविधा १ एप्रिलपासून सुरू केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात ‘लॉकडाऊन’ आहे. तसेच एकांतवासामुळे त्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे निवृत्तवेतनासाठी टपाल कार्यालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची यादी तयारी केली आहे. त्याप्रमाणे पोस्टमन ज्येष्ठ नागरिकांच्या दारी जाऊन त्यांचे निवृत्तवेतन देत आहेत, अशी माहिती भारतीय टपाल मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the elderly will get home pension