Coronavirus : राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; मृतांच्या संख्येतही वाढ

वृत्तसंस्था
Thursday, 9 April 2020

तीन हजारांवर सर्वेक्षण पथके

- मृतांचा आकडा ७५ वर

पुणे : कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येने एका महिन्याच्या आतच हजाराचा टप्पा ओलांडला. सध्या राज्यात १,२०५ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती देण्यात येत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात ९ मार्चला पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर प्रत्येक दिवशी कोरोनाच्या संसर्गाचे निदान होऊ लागले. एक महिन्याच्या आतच राज्यात कोरोनाबाधित १,२०५  रुग्णांची नोंद झाली. राज्यात १२ कोरोनाबाधित रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला.  मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये इतरही आजार आढळले आहेत. आत्तापर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, सातारा आणि मीरा भाईंदर येथे राहणाऱ्या नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Coronavirus

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता वेगाने वाढू लागली आहे. यातील काही रुग्ण वरळी, प्रभादेवी, दादर, धारावी, गोवंडी, अंधेरी या भागांतील असल्याचे समजते. नव्या १०० रुग्णांपैकी ५५ जण प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांच्या संपर्कात होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने घरोघरी घेतलेली शोधमोहीम, दवाखाने आणि संशयित रुग्णांच्या चाचणीतून ही माहिती समोर आली.

मृतांचा आकडा ७५ वर

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना दुसरीकडे यातील मृतांचा आकडाही वाढतच आहे. महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत ७५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. 

Coronavirus : पुण्यातही कोरोनाग्रस्त ...

तीन हजारांवर सर्वेक्षण पथके

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. सध्या साताऱ्यात २१४ सर्वेक्षण पथके काम करत आहेत तर हिंगोलीत ३४, सांगलीत ३१, रत्नागिरीमध्ये ३९ आणि जळगावमध्ये ४८ सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. राज्यात या प्रकारे तीन हजार ४९२ सर्वेक्षण पथके काम करत असून, त्यांनी १२ लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of Coronavirus Patient Increasing in Maharashtra